ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पशुधन आधारित व्यवसायांना चालना देण्यासाठी वर्धा येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा वर्धा, भारत लाईव्हस्टॉक अँड मार्केटिंग प्रोड्युसर कंपनी (BLAMP) फेडरेशन, नागपूर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये पशुधन आधारित FPC व BLAMP फेडरेशन तर्फे शेळी खरेदी व संकलन, पशुखाद्याची आवश्यकता व नियोजन, पशुधन आरोग्य शिबिर, संकलन केंद्र, मांस विक्री केंद्र, मूल्यवर्धित उत्पादने व विपणन, शासकीय योजनांची अभिसरण (Government Scheme Convergence), 31 मार्च 2027 पर्यंतचे व्यवसाय विकास नियोजन व अडचणी व त्यावरील उपाययोजना या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली. मा. प्रकल्प संचालक श्री. वैशाली रसाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सहाय्यक उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय श्री. संजय खोपडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. निरज नखाते, जिल्हा व्यवस्थापक- उपजीविका श्री. प्रतिक मुनेश्वर, जिल्हा व्यवस्थापक विपणन श्री. मनीष कावडे, पशुवैद्यक श्री. ऋषिकेश दोडेवार, तालुका अभियान व्यवस्थापक- सेलू श्रीम. ओमलता दरने, BLAMP संस्थेचे सीईओ श्री. दत्तात्रय चौगुले, मार्केटिंग मॅनेजर श्री. भूषण खेर्डे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यशाळेला एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्प अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पशुधन आधारित उपक्रमांना गती देणे व शेळी खरेदी विक्री करिता जिल्ह्यातील पशुधन आधारित FPC सोबत जोडणे या विषयावर चर्चा करून कार्यवाही करण्यात आली. पशुधन आधारित महिलांन करिता मोठा व्यवसाय होऊ शकतो. तसेच ग्रामीण भागात प्रत्येक घरी पशुपालन करतात. त्याला योग्य पद्धतीने तांत्रिक सहकार्य केले व त्याचे संगोपन केले तर ते व्यवसाय स्वरुपात करू शकतात. त्याच माध्यमातून FPC शेतकरी उत्पादक कंपनी सोबत जोडून मोठ्या स्वरुपात व्यवसायाला चालना मिळू शकते. याकरिता संयुक्त उपक्रम करणे गरजेचे आहे. त्यामध्ये उमेद, भारत लाईव्हस्टॉक अँड मार्केटिंग प्रोड्युसर कंपनी (BLAMP) फेडरेशन, नागपूर, व पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायविभाग यांनी संयुक्त कामा करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन करण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता दत्तात्रय चौगुले, मार्केटिंग मॅनेजर श्री. भूषण खेर्डे, उमेद चे मनोज चिखलकर CLM यानी सहकार्य केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील IFC प्रभागातील सर्व प्रभाग समन्वयक, ब्लॉक अँकर, वरिष्ठ सीआरपी, पशुधन आधारित FPC चे सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये