वर्धा शहर पोलीसांची धडाकेबाज कारवाई” ‘मोटर सायकल चोरी करणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या’…
पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली डि. बी. चांगली कामगिरी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे फिर्यादी नामे प्रफुल कृष्णराव रामटेके वय 47 वर्षे रा. मीरा नगर वार्ड नं. 5 सिंधी मेघे वर्धा ता. जि. वर्धा यांनी पो. स्टे. ला तोंडी रिपोर्ट दिला कि दिनांक 17/8/26 रोजी रात्री 08/00 वा. चे दरम्यान फिर्यादी हे त्यांचे ताब्यातील हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एम.एच.32 एल 737 ने बजाज चौक येथील भाजी बाजारात भाजीपाला घेण्याकरीता गेले होते. त्यांनी त्यांचे ताब्यातील मो.सा. बाजाराचे पहिल्या गेट जवळ केळाचे दुकानात बाजुला उभी करून भाजीपाला घेण्याकरीता गेले व भाजीपाला घेवुन अंदाजे रात्री 08/15 वा. चे सुमारास परत येवुन त्यांनी त्यांची मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची मोटार सायकल दिसली नाही. त्यांनी त्यांचे मोटार सायकलचा आजुबाजुचे परिसरात शोध घेतला असता मिळुन आली नाही. फिर्यादी यांची हिरो होन्डा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल काळया रंगाची टॅन्कवर सिल्वर रंगाचा पटटा असलेली क्र. एमएच 32 एल 737 किंमत अंदाजे 15,000/-रू ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. वर्धा शहर येथे गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र हाडके व त्यांचे पथक करीत आहे.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल ही अटक आरोपी वृषभ शंकरराव टेकाम वय 36 वर्षे रा. येरणगांव ता. बाभुळगांव जि. यवतमाळ यास यवतमाळ पोलीसांनी अटक केली असुन त्याने वर्धा येथुन मोटर सायकल चोरल्याचे सांगत असल्याने आरोपीचे ताब्यातुन पिसीआर दरम्यान त्याचे शेताजवळुन खालील प्रमाणे मोटर सायकल जप्त केल्या आहे.
30,000/-रु
1) एक जुनी वापरती हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल
काळया रंगाची पांढरा निळया
रंगाचा पटटा असलेली क्रमांक एमएच 32 एल 0737 25,000/-रु
2) एक जुनी वापरती हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल
काळया रंगाची पांढरा निळ्या 30,000/-रु रंगाचा पटटा असलेली क्रमांक एमएच 32 एम 6502 3) एक जुनी वापरती हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल काळया रंगाची पांढरा निळ्या रगाचा पटटा असलेली क्रमांक एमएच 32 ई 4195 30,000/-र 4) एक जुनी वापरती हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल काळया रंगाची पांढरा निळया 30,000/-रु रंगाची पांढरा निळया रंगाचा पटटा असलेली क्रमांक एमएच 32 एम 6851 5) एक जुनी वापरती हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल काळया 30,000/-रु रंगाची पांढरा रंगाचा पटटा रंगाचा पटटा असलेली क्रमांक एमएच 29 एसी 3337 6) एक जुनी वापरती बजाज प्लॉटीना कंपनीची मोटार सायकल काळया किंमत 1,75,000/-रु असलेली क्रमांक एमएच 32 एल 2496
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. सुनिल महाडीक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, श्री. नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक, शरद गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र हाडके, पोलीस अंमलदार राजेश डाळ, संतोष ईघारे, चेतन दुबे, चालक अझीम शेख, शशिकांत मुंढे यांनी केली असुन पुढील तपास वर्धा पोलीस करीत आहे.



