सदर गुन्ह्यात आरोपीस कारावासाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. श्री. ए.बी. इंगोले. कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यांनी पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ३१३/२२ कलम २९४, ५०६ भादंवि मध्ये आरोपी राजू विश्वनाथ राऊत, वय ४२ वर्षे, रा. मारोती वार्ड हिंगणघाट यांस खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम २९४, ५०६ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असुन १६ दिवस साध्या कारावाची शिक्षा व १०००/- रु दंड, दंड न भरल्यास ०२ दिवस साध्या कारावासाची शिक्षा.
घटनेचा थोडक्यात तपशील :-
यातील फिर्यादी शिवप्रतापसींग रामसींग ठाकुर, वय ४२ वर्षे, रा. सेन्ट्रल वार्ड हिंगणघाट व आरोपी हे गिमाटक्स कंपनीत कामाला होते. घटने दिवशी आरोपी याने फिर्यादीस म्हटले की, पठाण साहेबांना भेटायचे आहे गेट खोल. पठाण साहेब मिटींगमध्ये असल्याने आता भेटता येणार नाही असे फिर्यादी याने आरोपीस म्हटले असता, आरोपीने फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ केली. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ३१३/२२ कलम २९४, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोहवा सुमेध आगलावे, ब.नं. ४७२ पो.स्टे. हिंगणघाट यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. रवीकुमार चौधरी यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार मपोहवा/सिमा जांगडेकर, ब.नं ९५१ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे, तसेच पो. स्टे हिंगणघाट ठाणेदार पो.नि, अनिल राऊत यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. मा. श्री. ए.बी. इंगोले, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यांनी गुन्ह्यातील आरोपी यास कलम २९४, ५०६ भादंवि मध्ये दोषी ठरविले असुन १६ दिवस साध्या कारावाची शिक्षा व १०००/- रु दंड, दंड न भरल्यास ०२ दिवस साध्या कारावासाची शिक्षा शिक्षा सुनावलेली आहे.
(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक स्था.गु. शाखा वर्धा



