विदर्भ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- श्री व्यंकटेश बहुद्देशीय संस्था, गडचांदूर संचालित विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथे राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंगाम, डॉ. श्रीकांत पानघाटे आणि डॉ. गंगाधर लांडगे उपस्थित होते. तसेच IQAC समन्वयक डॉ. परवेज अली यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. रा.से.यो.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि स्वयंशिस्त यांसारख्या मूल्यांची जोपासना होते. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजाच्या विकासासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमित बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली डोर्लिकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन ग. यनगंदलवार यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रा.से.यो.चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रा.से.यो. स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



