ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायबर पोलीस ठाणे, वर्धा यांची कारवाई

म्युल बँक खात्यांचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

म्युल बँक खात्यांचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा वर्धा सायबर पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र सायबर व 14C (Indian Cyber Crime Coordination Centre) कडून प्राप्त झालेल्या संशयास्पद खात्यांच्या यादीच्या आधारे सायबर पोलिसांनी अकोला अर्बन को-ऑप. बँक लि., शाखा वर्धा येथील खात्यांची सखोल चौकशी केली व नमूद खात्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने पो.स्टे. सायबर वर्धा येथे अपराध क्रमांक १७/२०२६, कलम ३१८ (४), ६१ (२) भारतीय न्याय संहिता सहकलम ६६(D) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

तपासादरम्यान अकोला अर्बन बँकेतील काही खात्यांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले व गुन्ह्यातील आरोपी नवीन सुरेश आहुजा वय ४२ वर्षे, रा. वर्धा आणि आशिष उर्फ आशू श्यामकुमार दुब्बानी वय २८ वर्षे यांनी इतर साथीदारांशी संगणमत करून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी नागरिकांच्या नावे बैंक खाती उघडली.

या बँक खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा करण्यासाठी, इतर खात्यांत वळवण्यासाठी तसेच रोख रक्कम काढण्यासाठी केला जात होता. आरोपी आशिष उर्फ आशू श्यामकुमार दुब्बानी हा सालोड येथील महिलांच्या नावे बेकायदेशीरपणे सिमकार्ड तयार करून देत असल्याचे आणि आरोपी नवीन आहुजा याने नमूद साक्षीदार महिलांचे नावे बँक खाते उघडून खाते फसवणुकीची रक्कम वळविण्यासाठी घेतल्याचे तपासात दिसून आले.

कायदेशीर कारवाई:

या प्रकरणी आरोपी नवीन सुरेश आहुजा व आशिष उर्फ आशू श्यामकुमार दुब्बानी या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाणे, वर्धा येथे अपराध क्रमांक १७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ६१(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मार्गदर्शन व पोलीस पथकः

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत पाटील यांच्या दिशानिर्देशात पोलीस उपनिरीक्षक आयेशा मुल्ला, पोलीस हवालदार वैभव कटोजवार, अमित शुक्ला, ओमप्रकाश कोकोडे, रणजित जाधव, पोलीस शिपाई पवन झाडे, महिला पोलीस शिपाई लेखा राठोड, आरती पारीसे व सायबर पोलीस ठाणे, वर्धा येथील पथकाने केली आहे.

जनहितार्थ आवाहन (वर्धा सायबर पोलीस):

“सायबर फसवणुकीपासून सावध राहा. कोणत्याही अनोळखी अथवा संशयित व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी (OTP), सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारांचे अधिकार वापरण्यासाठी देऊ नका. कर्ज देण्याच्या आमिषाला बळी पडू नका. फसवणूक झाल्यास तात्काळ ‘१९३०’ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये