आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे चेतनसिंह गौर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तालुका गोंडपिपरीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी गोंडपिपरी येथील कन्यका माता सभागृहात हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून एका रक्तदात्याच्या योगदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी केवळ शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता या विधायक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी तालुका गोंडपिपरीच्या वतीने करण्यात आले असून चेतनसिंह गौर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न होणार असून याकरिता नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘रक्तदान करा… जीवनदान द्या!’ या सामाजिक संदेशातून वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रमाने साजरे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
*चेतनसिंह गौर, भाजपा शहराध्यक्ष तथा गटनेता, नगर पंचायत, गोंडपिपरी*



