ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचे दिव्यांगांसोबत दिपावली स्नेहमिलन

दिव्यांगांच्या कल्याणसाठी सदैव कटिबद्ध - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थितीत केळकरवाडी येथे दिव्यांग बांधवांसोबत दिपावली स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी दिव्यांगांशी संवाद साधला तसेच फराळ कीटचे वाटप केले. दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी माजी खासदार रामदास तडस, नगर परिषदेच्या बांधकाम सभापती राखी पांडे, संजय गाते, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव, कामगार नेते मिलींद देशपांडे, भोजराज पाटील, रविंद्र शेंडे, कमलाकर निंबाळकर आदी उपस्थित होते.

दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा खऱ्या अर्थाने लाभ व्हावा यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली आहे. विभागामार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यात येत आहे. संजय गांधी निरागार योजनेमध्ये सुध्दा दिव्यांगांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये विशिष्ट निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेस फंड योजनेतील दिव्यांगासाठी राखीव असलेला 5 टक्के निधी खर्च होत नव्हता. आता तो खर्च होत असल्याने दिव्यांगांना खऱ्या अर्थाने लाभ मिळत असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. या निधीतून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी त्यांना उपयुक्त असलेल्या योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शारीरीक विकलांग असलेल्या आणि साहित्यापासून वंचित असलेल्या दिव्यांगाना मोफत साहित्य पुरविण्यासाठी शिबिराचे आयोजन केल्या जाते. साहित्याच्या लाभासाठी जिल्ह्यात लवकरच विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते दिव्यांगांना फराळ कीटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव उपस्थित हो

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये