ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खिर्डी येथे पारंपरिक पद्धतीने गाय गोधन व गोवर्धन पूजन उत्साहात साजरे.

ढोल-ताशांच्या गजरात सजविलेल्या गाईची गावातून भव्य मिरवणूक ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग. 

कोरपना :_

दीपावलीनिमित्त कोरपना तालुक्यातील मौजा खिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने गाय गोधन व गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा श्री. बापूराव रामचंद्र नागोसे यांच्या परिवाराकडून आजही श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. यंदाही त्यांच्या निवासस्थानापासून या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी गाईला पारंपरिक पद्धतीने आकर्षक साजशृंगार करण्यात आला. गाईच्या शिंगांना रंगरंगोटी करून, मोरपंख लावून तसेच सुंदर झुला चढवून गाईला सजविण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत आणि नाचत-गाजत सजविलेल्या गाईची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

          या मिरवणुकीदरम्यान गावातील मारुती मंदिरात गाईचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर माऊलीकडे मिरवणूक नेण्यात आली. तेथून पुन्हा वाजतगाजत मिरवणूक नागोसे यांच्या निवासस्थानी आणण्यात आली. घरी आल्यानंतर विधिवत पूजा-अर्चना करून या पारंपरिक सोहळ्याची सांगता करण्यात आली.

        या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ मंडळी, युवक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहकार्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रामुख्याने श्री. सुभाष शेरकी, श्री. आनंदराव शेरकी, श्री. विठ्ठल गव्हाणे, श्री. रमेश पाल, श्री. सखारामजी ढवस, श्री. अरुण काळे, श्री. विलासजी कुडे, श्री. बापूराव डुकरे, श्री .दीपक खेकारे , श्री. सुरेश नागोसे, श्री. दशरथ नागोसे, श्री. विलास नागोसे, श्री. रमेश मते, श्री. राकेश बोटपल्ले, श्री. उत्तम शेरकी, श्री. राजू नागोसे, श्री. भिवसन कुमारे, श्री. शंकर मडावी, श्री. मारुती मांडवकर, श्री. उत्तम कनाके, श्री. नवनाथ न्याहारे, श्री. भाऊराव दातारकर, श्री. शंकर शिटलवार, श्री. दिलीप पिंपळकर, सतीश राखुंडे श्री. भीमराव कोटनाके, श्री. दिलीप राखुंडे, श्री. भास्कर दातारकर, गणेश गोहणे, श्री. शंकर मते यांच्यासह गावातील अनेक लहान-थोर नागरिकांनी सहभाग घेतला.

          भारतीय संस्कृतीमध्ये गोधनाला विशेष महत्त्व असून, गाय ही समृद्धी, श्रद्धा आणि कृषी संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. अशा पारंपरिक उत्सवांच्या माध्यमातून गावातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीचे जतन होत असल्याचे या सोहळ्यातून पुन्हा एकदा दिसून आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये