ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेती आणि गोसंवर्धन हे भारतीय संस्कृतीचे मूळ – हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी असलेले नाते हे भारतीय संस्कृतीचे खरे अधिष्ठान आहे. गोवर्धन पूजा ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती शेतकऱ्यांच्या कष्टांचा, निसर्गाप्रती कृतज्ञतेचा आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारी परंपरा आहे. शेती आणि गोसंवर्धन हे भारतीय  संस्कृतीचे मूळ असून या परंपरांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

      दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त दि. 10 नोव्हेंबर 2026 रोजी नेहरू नगर येथील जागर्स पार्क मध्ये भव्य गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी हंसराज अहीर यांनी गौमातेचे पूजन करून गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच गौपालकांना दुपट्टे आणि दुधाच्या किटलींचे वाटप करून त्यांच्या सन्मान केला.

    याप्रसंगी ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, महापौर संगीताताई खांडेकर, भाजप नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, मोहन चौधरी, विनोद शेरकी, वंदनाताई हातगांवकर, रोडमत गहलोत, रविंद्र गुरनुले, मनोज पॉल,  प्रमोद शास्त्रकार, रवि जोगी, नगरसवेक नितेश गवळी, जितेश कुळमेथे, शितलताई गुरनुले, अनुजाताई तायडे, सरलाताई कुळसंगे, दिवाकर पुद्दटवार, निलेश बेलखेडे, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, दिनकर सोमलकर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, प्रदीप किरणे, पुनम तिवारी, गौतम यादव, संजय मिसलवार, सुदामा यादव, माजी नगरसेविका वनिता डुकरे, ऋतुजा नागापूरे, मयूर भोकरे, प्रवीण गिलबिले, संजय तिवारी, अमित करपे, सुमित बेले, आशय चंदनखेडे, पराग मलोडे, अंजी मातंगी, विनोद पंदीलवार, चेतन शर्मा, उमेश साळुंखे, जनार्दन भुजाडे, राजू साळुंखे, राजकुमार भगाडे, सागर वाजेकर आणि श्रावण गदई यांची उपस्थिती होती.

         पूढे बोलताना हंसराज अहीर म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी अहोरात्र मेहनत करून संपूर्ण समाजाची अन्नाची गरज भागवतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करणे आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे. गोवर्धन पूजा हा त्याच कृतज्ञतेचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात आपल्या पारंपरिक मूल्यांचे जतन करणे अधिक महत्त्वाचे झाले असून नव्या पिढीपर्यंत या संस्कारांचा वारसा पोहोचविणे आवश्यक आहे.

   भारतीय जनता पार्टी सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करीत आहे. सण-उत्सव हे समाजाला जोडणारे आणि परस्परांमध्ये बंधुभाव वाढविणारे प्रभावी माध्यम आहे. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन केल्यानेच सामाजिक एकात्मता अधिक दृढ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

       दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाश केवळ दिव्यांपुरता मर्यादित न राहता तो आपल्या विचारांत आणि कृतीतही उतरला पाहिजे. समाजातील अंधार, विषमता आणि अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही हंसराज अहीर यांनी केले.

  या महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये