वर्धा जिल्ह्यात शस्त्र अधिनियम गुन्ह्यातील आरोपी तपासणी मोहीम आणि नागरिकांना माहिती देण्याबाबत आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यात सन २०२१ पासून कलम ३/२५, कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा तसेच शरीरा विरुद्धच्या गुन्ह्यात चाकू, तलवार यासारख्या शखांचा वापर केलेल्या आरोपीची तपासणी मोहीम राबविण्याकरिता पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी आदेश दिले होते. या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक वर्धा, श्री सदाशिव वघमारे यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार दिनांक, २२/१०/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ चे १८.०० वा पर्यन्त जिल्ह्यातील स्थानीक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्टेशनकडून सदर मोहीम प्रभावीपणे राबवून आरोपींची पडताळणी करण्यात आलीआहे.
या मोहिमेची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहेः वर्धा जिल्ह्यात एकूण १०९७ आरोपी निष्पन्न झाले आहेत.
त्यापैकी ७०६ आरोपींची प्रत्यक्ष तपासणी (चेक) करण्यात आली.
* तपासणी करण्यात आलेल्या आरोपीपैकी ३६७ आरोपी मिळून आले आहेत.
२९२ आरोपी मिळून आलेले नाहीत.
* २३ आरोपी मृत असल्याचे निदर्शनास आले आहे.
* २४ आरोपी सध्या जेलमध्ये आहेत.
सदर मोहिमेदरम्यान मिळून आलेल्या आरोपींच्या पराची कसून परझडती घेण्यात आली असून, त्यात कोणताही मुद्देमाल मिळून आलेला नाही.
नागरिकांना आवाहनः वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वर्धा जिल्ह्यात जर कोणी व्यक्ती विनापरवाना शत्र घेऊन फिरत असेल किंवा शस्राचा गैरवापर करत असेल, तर याबाबतची कोणतीही माहिती तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी, जेणेकरून योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.



