ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूस-ताडाळी मार्गावर बुलेट आणि स्कूटीची समोरासमोर धडक; युवक गंभीर जखमी

गंभीर प्रकृतीमुळे नागपूरला हलविल्याची माहिती ; बुलेटस्वार घटनास्थळावरून पसार झाल्याचीही चर्चा

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपूर : घुग्घूस-ताडाळी मार्गावर मंगळवारी, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान बुलेट आणि स्कूटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात स्कूटीस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, अपघातानंतर बुलेटस्वार युवक घटनास्थळावरून पसार झाल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. मात्र, अपघात नेमका कसा घडला आणि त्यामागील कारण काय होते, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

घुग्घूस-ताडाळी मार्गावर सातत्याने घडणाऱ्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर संबंधित प्रशासन आणि अधिकारी रस्ते अपघात रोखण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षेसाठी कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये