ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंड गोवारी समाजाचे पारंपरिक गायगोधन उत्साहात संपन्न

आदिम संस्कृती आणि पूर्वापार परंपरेचा वारसा जपणारे हेठी गाव : गोंड गोवारी समाजाच्या एकजुटीचे घडले दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      भद्रावती तालुक्यातील निंबाळा-हेठी येथे आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वतीने पारंपरिक गायगोधन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

पूर्वापार गोपालक असलेल्या गोंड गोवारी समाजाने आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा आजही जिवंत ठेवला आहे. त्याच परंपरेनुसार गोमातेचे विधिवत पूजन करून गायगोधन साजरे करण्यात आले.

आदिवासी गोंड गोवारी जमात तथा ग्रामीण विकास सेवा समिती, निंबाळा-हेठी यांच्या अथक प्रयत्नांतून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि धार्मिक विधींमधून आदिवासी संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले. या सोहळ्यामुळे निंबाळा परिसराला अक्षरशः भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पंचक्रोशीतील नागरिकांसह गोंड गोवारी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर पाटील ताजने, भद्रावती तालुकाप्रमुख नरेश काळे, मुख्य राज्य संयोजक मनोहर सहारे, सचिव रामदास नेवारे, अमनदादा नेवारे, तिरुमल किशोर चौधरी, तिरुमल पत्रू नागोसे, केशव सोनवणे, विलास राऊत, शंकर नेवारे, छाया सोनवणे, श्वेता नागोसे आणि प्रतिभा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करण्यासोबतच समाजातील एकजूट आणि संघटनशक्तीचा प्रत्यय या सोहळ्यातून आला. आधुनिकतेच्या युगातही परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये