ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी बांधवांशी संवाद साधत सुभाषभाऊ धोटेंनी जपला आपुलकीचा स्नेहबंध!

पिपर्डा, धानोली, येरगव्हाणसह विविध गावांना सदिच्छा भेटी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना (ता.प्र) :– दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त जनतेशी असलेला स्नेहबंध अधिक दृढ करत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी कोरपना तालुक्यातील मौजा पिपर्डा, धानोली, येरगव्हाण यांसह परिसरातील विविध गावांना सदिच्छा भेटी दिल्या. यावेळी त्यांनी स्थानिक आदिवासी बांधव, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत दिवाळी व भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींमधून ग्रामीण भागातील जनसंपर्क अधिक मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला.

        या भेटीदरम्यान आदिवासी समाज बांधवांच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या लोकनृत्य, कला, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे त्यांनी अवलोकन केले. आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि लोककलेचे जतन करणाऱ्या कलाकारांचे त्यांनी विशेष कौतुक केले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या दैनंदिन समस्या, विविध अडीअडचणी तसेच गावांच्या विकासासंदर्भातील अपेक्षा जाणून घेतल्या. जनतेचे प्रश्न हेच आपले प्राधान्य असून, संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याची ग्वाही सुभाषभाऊ धोटे यांनी यावेळी दिली.

       यावेळी कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, भाऊराव चव्हाण, श्यामभाऊ रणदिवे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये