ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी बालगृहातील अनाथ मुलींसोबत साजरी केली भाऊबीज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज शारदा कला व सांस्कृतिक मंडळ द्वारे संचालित आणि महिला व बालविकास विभागाद्वारे अनुदानित उष:काल बालगृहातील अनाथ मुलींसोबत भाऊबीज साजरी केली. बालगृहातील ४० मुलींनी पालकमंत्र्यांचे औक्षण केले.
यावेळी मुलींना पालकमंत्र्यांनी खाऊचे वाटप केले. बालगृहातील चिमुकल्या बहिनींसोबत दिवाळी व भाऊबीजेचा आनंद द्विगुणीत झाला असल्याची भावना यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.



