ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकऱ्यांच्या अडचणी योजनेबाबत कृषी मंत्री घेणार आढावा आ. भोंगळे यांचा प्रयत्नला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपना :_ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी उत्पादक कंपनी पुढाकार घेऊन प्रकल्प उभे केले मात्र यामध्ये अनेक अडचणी असल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे बांधकाम होऊन सुद्धा प्रकल्प कार्यान्वित झाले नसल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे शेतकऱ्यांची लूट थांबावी शेतकऱ्यांना योग्य दरात मोबदला मिळावा उत्पादित धान्याचे मूल्यवर्धन साखळी निर्माण करून बाजारभावात आर्थिक शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प उभे झालेले आहे मात्र त्यामध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन देऊन माननीय मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्री यांच्याकडे संपूर्ण अधिकारी व अडचणी असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी व प्रभाग संघ यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करावे.

अशी मागणी केली होती याबाबतची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे मूल्यवर्धन साखळी स्मार्ट प्रकल्प डॉ.  पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय स्थलांतर थांबवून अकोला या ठिकाणी ठेवण्याची गरज जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक योजना राबविण्यासाठी निधीचे नियोजन नानाजी देशमुखनव संजीवनी योजना पोकारा 02 अटी शिथिल करून पोखरा एकच्या धरतीवर अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय व योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवून चंद्रपूर जिल्ह्यातील वैयक्तिक शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजना त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2026 मा कृषिमंत्री यांच्या दालनात मंत्रालय येथे ३वाजता बैठकी चे आयोजन केले असून तसेच सूचना पत्र संबंधित अधिकारी यांना निर्गमित केले असून चंद्रपूर जिल्हा वैनगंगा शेतकरी उत्पादक कंपनी संघाच्या उपाध्यक्ष यांना पत्र देऊन प्रकल्पातील सर्व शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी व शेतकरी यांनी उपस्थित राहण्याबद्दल कळविले आहे.

या बैठकीमध्येनिर्माण झालेल्या अडीअडचणी व प्रकल्प राबवण्यामध्ये येत असलेल्या समस्यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा महासंघाचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी केले आहे या भेटीला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे हे देखील उपस्थित राहणार आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये