ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दत्तात्रय पिंपळे यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील अमृत नगर मधील रहिवासी दत्तात्रय पिंपळे यांचे दिनांक 3नोव्हेंबर रोजी वयाचा 83व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

मृत्यू पश्चात त्यांची मुले सोपान आणि ज्ञानेश्वर यांनी वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंट्स ग्रुप चे प्रमुख डॉ. अशोक काबरा व पत्रकार मधुकर रायमूल यांचे सोबत संपर्क साधला. त्यांनी जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमूस बोलावून दत्तात्रय पिंपळे यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले.

त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पत्नी, 2मुले, 1मुलगी, 3 भाऊ, 4 बहिणी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या मुलांनी घेतलेल्या नेत्रदानाच्या निर्णया मुळे या पृथ्वी तलावरील 2 अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये