हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप घुग्घूसच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी घुग्घूसच्या वतीने डेबूजी बहुउद्देशीय समाज विकास संस्था, चंद्रपूर यांच्या सावली येथील वृद्धाश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भोजनदान करून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी भाजप घुग्घूस शहराध्यक्ष संजय तिवारी, रामपाल वर्मा, नगरसेवक गणेश पिंपळकर, नगरसेविका मधु तिवारी, महिला अध्यक्ष शुचिता लुटे, माजी ग्रामपंचायत सरपंच संतोष नुने, कामगार नेते एम.बी. देशमाने, अनिल बाम, युवा नेते राजेश मोरपाका, विशाल दामेर, इस्पंधन मडावी, चिरू तलपल्ली, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, सुनीता गिवे, सोनाली पंघाटे, शुभांगी गिरडकर, सुनीता पाटील, मुक्ता धाबेकर, प्रतिज्ञा तिवारी, राखी दांगे, हिमांशू तिवारी, राहुल तिवारी आणि प्रख्यात पथाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमातून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, आपुलकी आणि सेवाभाव व्यक्त केला.



