ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी बालगृहातील चिमुकल्या बहिनींसोबत साजरी केली भाऊबीज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी शारदा कला व सांस्कृतिक मंडळ द्वारे संचालित आणि महिला व बालविकास विभागाद्वारे अनुदानित उष:काल बालगृहातील अनाथ मुलींसोबत भाऊबीज साजरी केली. बालगृहातील ४० मुलींनी पालकमंत्र्यांचे औक्षण केले. यावेळी मुलींना पालकमंत्र्यांनी खाऊचे वाटप केले.

यावेळी पालकमंत्र्यांसह महिला व बालविकासच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण, शारदा कला व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा उषा फाले, संस्थापक अध्यक्ष मुरलीधर फाले, नालवाडीचे सरपंच गौरव गावंडे आदी उपस्थित होते.

बालगृहातील चिमुकल्या बहिनींसोबत दिवाळी व भाऊबीजेचा आनंद द्विगुणीत झाला असल्याची भावना यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. विविध कारणांमुळे अनाथ किंवा कुटुबांपासून दुरावलेल्या महिला, मुलींना देखील दिवाळी उत्सवाचा आनंद साजरा करता आला पाहिजे, या भावनेतून चिमुकल्या बहिनींसोबत मी देखील भाऊबीजेचा आनंद साजरा करत आहे, असे पालकमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

बालगृह चालविणे सोपे नाही, संस्थांच्या वतीने गेल्या वर्षापासून बालगृह चालविण्यात येत आहे. कोणतेही चांगले काम करतांना अडचणी असतात परंतु चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी नेहमी परमेश्वर असतो. या बालगृहातील अनेक विद्यार्थीनी शिकून पुढे गेल्या, त्यांना आयुष्याचा मार्ग गवसला, त्यांचे जीवनमान सुकर झाले. भविष्यात अशा कामांसाठी मदत लागल्यास निश्चितच करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले.

यावेळी बालगृहातील चिमुकल्या बहिनींनी आपल्या पालकमंत्री असलेल्या भावाला ओवाळणी घातली व त्यांचे औक्षवण केले. पालकमंत्र्यांनी देखील त्यांच्याशी आत्मियतेने संवाद साधला व खाऊचे वाटप केले. महिला व बालविकासच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील औक्षण केले. सुरूवातीस संस्थेच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला बालगृहातील मुलींसह महिला व बालविकासचे अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे कर्मचारी उपस्थत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये