डॉ.धनराज खानोरकरांच्या ‘संजोरी’ला महामृत्युंजय राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ नाटयश्री साहित्य कला मंचद्वारे गडचिरोली येथील महामृत्युंजय राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार कवी,लेखक, पत्रकार डॉ धनराज खानोरकर यांना त्यांच्या ‘संजोरी’ ग्रंथाला नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ,रोख रक्कम व सन्मानपत्र राहणार असून हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना लवकरच बहाल करण्यात येईल.
डॉ धनराज खानोरकर यांच्या ‘ संजोरी ‘ ललित ग्रंथाला मिळालेला हा चवथा राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार असून हा ग्रंथ अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.त्यांचे पाच काव्यसंग्रह, चार संपादित ग्रंथ,एक ललित ग्रंथ प्रकाशित असून पन्नास शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत.याशिवाय अनेक वृत्तपत्रात त्यांचे सातत्याने सदर सुरू असून कविता, लेख,स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे.३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलननाचे ते अध्यक्षही होते आणि बोलीभाषा अभ्यासक म्हणून त्यांची दूरदर्शन व आकाशवाणीवर मुलाखतही प्रसारित करण्यात आलेली आहे.



