ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरी नगरपंचायतीला दोन कोटींचा विकासनिधी मंजूर

शहरातील दहा विकासकामांना मिळणार गती; आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांबद्दल भाजपकडून आभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक विकासकामांना चालना देण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निधीतून शहरातील दहा महत्त्वपूर्ण विकासकामे केली जाणार असून, यामुळे नागरिकांच्या सुविधांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांमुळे हा विकासनिधी मंजूर झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

*मंजूर विकासकामांचा तपशील पुढीलप्रमाणे*

प्रभाग क्रमांक ७ मध्ये मच्छी व मटन मार्केट विकसित करणे – ३० लाख रुपये., दर्ग्याकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्वधर्मीय स्मशानभूमीचा विकास – १५ लाख रुपये., प्रभाग क्रमांक ८ मध्ये बुद्ध विहार परिसरात रस्ता बांधकाम – १५ लाख रुपये., प्रभाग क्रमांक ८ मध्ये जिल्हा परिषद कन्या शाळेत खेळाचे मैदान व बगीचा विकसित करणे – १५ लाख रुपये., प्रभाग क्रमांक १० मध्ये माता मंदिर परिसरात खेळाचे मैदान व बगीचा विकसित करणे – १५ लाख रुपये., गोंडपिपरी नगरपंचायत अंतर्गत वाचनालयाचे नूतनीकरण व फर्निचरची कामे – २० लाख रुपये., प्रभाग क्रमांक १४ मध्ये श्रीराम मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकाम – ३५ लाख रुपये., प्रभाग क्रमांक १५ मध्ये महादेव मंदिर परिसरात समाज सभागृह बांधकाम – १५ लाख रुपये., प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वे क्रमांक २२९/१ येथील नगरपंचायतीचे खेळाचे मैदान विकसित करणे – १५ लाख रुपये., प्रभाग क्रमांक ६ मध्ये जिल्हा परिषद मुलांची शाळा परिसरातील नगरपंचायतीचे खेळाचे मैदान विकसित करणे – २५ लाख रुपये.

*शहराच्या विकासाला मिळणार चालना*

या दहा कामांसाठी एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रस्ते, बाजारपेठ, स्मशानभूमी, वाचनालय, उद्याने, क्रीडांगणे आणि सामाजिक सभागृह अशा विविध सार्वजनिक सुविधांचा समावेश आहे.

शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, मंजूर कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहणार आहे. निधीचा योग्य विनियोग करून प्रत्यक्ष कामांना लवकर सुरुवात झाल्यास गोंडपिपरी शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळू शकते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये