नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत आरसीईआरटीच्या कबड्डी संघाची विजयी भरारी!
बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बामणी येथे आयोजित स्पर्धेत मुलांच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक ; खेळाडूंच्या दमदार कामगिरीने महाविद्यालयाचा गौरव
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) अंतर्गत बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बामणी, बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे आयोजित नागपूर विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या क्रीडा यशात मानाची भर घातली.
या स्पर्धेत RCERT च्या मुलांच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट चढाया, भक्कम बचाव, चपळता आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपद मिळविले. खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या क्रीडा कौशल्याची छाप पाडली. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
या विजयी संघामध्ये आयुष कपाठ (चतुर्थ वर्ष, मेकॅनिकल), अमन भालवे (चतुर्थ वर्ष, मेकॅनिकल), रुजल भगत (द्वितीय वर्ष, सिव्हिल), ध्रुव कल्लो (तृतीय वर्ष, CSE), संघर्ष राऊत (द्वितीय वर्ष, इलेक्ट्रॉनिक्स), प्रज्वल लाखमापूरे (द्वितीय वर्ष, इलेक्ट्रिकल), गिरीश कुलमेथे (तृतीय वर्ष, सिव्हिल), संस्कार बोबडे (चतुर्थ वर्ष, CSE डेटा सायन्स), ओम भंडारकर (प्रथम वर्ष, मेकॅनिकल), स्मित विधाते (चतुर्थ वर्ष, मेकॅनिकल), संदेश पोते (चतुर्थ वर्ष, मायनिंग) आणि सोमेश्वर झाडे (चतुर्थ वर्ष, मेकॅनिकल) या खेळाडूंचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले व पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आदित्य आंबटकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही RCERT चे विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करत असून, बामणी येथे आयोजित स्पर्धेत कबड्डी संघाने मिळविलेले हे विजेतेपद महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द, खिलाडूवृत्ती, शिस्त आणि सांघिक भावना यांचे हे फलित असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.



