पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली साप्ताहिक आढावा बैठक संपन्न
कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक १२.११.२०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि मा, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत साप्ताहिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले व सूचना देण्यात आल्या.
१) पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन :
बैठकीच्या सुरुवातीला मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी वर्धा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांनी अधोरेखित केलेले प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः
सतर्कता व जबाबदारी: प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे.
गुन्हेगारीवर वचक : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था भक्कम ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगार, अवैध धंदे आणि बेकायदेशीर हालचालींवर कठोर व सतत वचक ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
उत्कृष्ट कामगिरी : जनतेमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारे पारदर्शक, गतिमान आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याचे सूचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या,
२) मानवी तस्करी आणि बाल गुन्हेगारी ए.एच.टी.यू. (AHTU) समूहाच्या वतीने मानवी तस्करी व बाल गुन्हेगारी, बालकांसंबंधी गुन्हे व गुन्ह्याचा तपास या संबंधी पी.पी.टी. (PPT) चे सादरीकरण करून मार्गदर्शन करण्यात आले.
३) बीट रिफॉर्म पोलीसिंग (Beat Policing): बीट रिफॉर्म पोलीसिंग या विषयावर वाचक पोलीस निरीक्षक, वर्धा यांनी माहिती सादर केली.
भविष्यात नवीन बीट पोलीसिंग कुठे आणि कशी राबवायची तसेच नवीन पोलीस चौक्या कार्यान्वीत करण्यासंबंधाने सविस्तर आढावा घेऊन पोलीस अधीक्षक यांनी बीट रिफॉर्मेशन्ससाठी सर्व ठाणेदार व उप विभागीय पोलीस अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
४) एन.डी.पी.एस. (NDPS), अवैध धंदे व आरोपी चेकिंग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी एन.डी.पी.एस. (NDPS) गुन्हेगारी व कारवाईबाबत माहिती सादर केली.
एन.डी.पी.एस. प्रकरणांमध्ये योग्य तपासणी करण्याबाबत विशेष तपासणी मोहीम राबवण्याबाबत मा. पोलीस अधीक्षकांनी आदेशित केले. तसेच अवैध धंदे, स्ट्रीट क्राईम, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, वाहन चोरी आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दारूबंदी आणि एनडीपीएस (NDPS) अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यावर भर देऊन गुन्हेगारांवर सतत वचक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाहिजे आरोपींवर कारवाई व शोधमोहीमः गुन्हे करून लपून बसलेल्या तसेच फरार असलेल्या पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर कायदेशीर व कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
समृद्धी महामार्ग सुरक्षाः समृद्धी महामार्गावर कोणतेही गंभीर गुन्हे घडणार नाही तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी बिटची विभागणी करुन त्यावर अधिकारी व अंमलदार नेमण्यात आले असुन त्यांनी कश्या प्रकारे हि योजना राबवुन कर्तव्य बजावले पाहीजे यासंबंधाने मार्गदर्शन केले.
मा. पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहून उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या सुचना दिल्या आहेत
या बैठकीला वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि इतर सर्व संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



