रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
७ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व रेती चोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले आहेत. या आदेशान्वये जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली जात असून सदर मोहिमेदरम्यान, दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा आर्वी पथक हे पोलीस स्टेशन आष्टी हद्दीत गस्त घालतेवेळी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा नवीन अंतोरा बसस्टॉप येथे सापळा रचून धाड टाकण्यात आली. या कारवाईत विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक जागीच पकडला गेला.
कारवाईतील आरोपी :
1. निकेश नरेश गजाम वय २७ वर्ष, रा. मौजा जैतापूर, ता. आष्टी, जि. वर्धा चालक/ताब्यात घेतला
2. समीर खान रा. आष्टी, जि. वर्धा- ट्रॅक्टर मालक, पसार
सदर आरोपी हे संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या मालकीची रेती चोरट्या मार्गाने वाहतूक व विक्रीचा अवैध व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपींवर पोलीस स्टेशन आष्टी येथे अप. क्र. ३६४/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. सहकलम ३ (१)१८१, १३०/१७७ मो. वा. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला मुद्देमालः
1. एक निळ्या रंगाचा सोनालिका छत्रपती ७४५ ट्रॅक्टर (क्र. MH 32 AX 7247) कि. रु. ६,००,०००/-
2. ट्रॅक्टरला जोडलेली विना क्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली कि. रु. १,००,०००/-
3. ट्रॉलीमध्ये भरलेली अंदाजे ०१ ब्रास रेती कि. रु. १०,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल कि. रु. ७,१०,०००/- (सात लाख दहा हजार रुपये).
सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांचे निर्देशप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री विनोद चौधरी पोलिस अंमलदार खुशाल राठोड दीपक जंगले, मंगेश आदे, रितेश कुराडकर, उमेश शेंदरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



