ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेडगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१६५ नागरिकांची आरोग्य तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव अंतर्गत उपकेंद्र वेडगाव येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’, ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ आणि ‘आरोग्य सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी (NCD Screening) तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण १६५ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १४५ लाभार्थ्यांची रक्तदाब (बीपी) तपासणी, तर ११० लाभार्थ्यांची रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली.

तपासणीमध्ये संशयित आढळलेल्या लाभार्थ्यांना पुढील तपासणी तसेच आवश्यक उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक स्तरावरच आरोग्यविषयक समस्या ओळखून पुढील उपचार घेण्यासाठी मदत झाली.

या आरोग्य शिबिरादरम्यान डॉ. राहुल लांडे, एएनएम रजनी सिस्टर तसेच संबंधित आशा सेविका उपस्थित होत्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखर नियंत्रण तसेच आजारांचे वेळीच निदान करण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच विविध असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान आणि उपचारासाठी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा ग्रामस्थांना मोठा लाभ झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये