खतांची खरेदी-विक्री २५ सप्टेंबरपासून ई-पासवरच
बुकींगनंतर क्यूआर कोडद्वारे खरेदी; डीएपी, युरिया व एसएसपीसाठी खरेदी मर्यादा निश्चित
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पारदर्शक व सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी २५ सप्टेंबर २०२६ पासून खतांची खरेदी-विक्री ई-पॉस प्रणालीद्वारेच करण्यात येणार आहे. त्यामुळे भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना संबंधित कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस प्रक्रियेची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे.
खत खरेदीसाठी ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर क्यूआर कोडद्वारे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. डीएपी, युरिया व एसएसपी खतांच्या खरेदीसाठी निश्चित मर्यादा लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्यानुसारच खत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नवीन प्रणालीमुळे खत वितरणात पारदर्शकता येण्यासोबतच गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे. भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना आवश्यक कागदपत्रे व माहिती सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खत खरेदी बाबत काही तक्रारी असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनतालुका कृषी अधिकारी सुशील आडे यांनी केले आहे.



