ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बरांज तांडा येथे २८ सप्टेंबरला भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       महाराष्ट्र शासनाच्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यात दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुका व वस्ती पातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

भद्रावती तालुक्यातील बरांज तांडा येथील घमाबाई प्राथमिक/माध्यमिक (निवासी) आश्रमशाळेत दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आदी विविध आवश्यक कागदपत्रांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भटके-विमुक्त समाजातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये