जागतिक महिला दिनानिमित्त लोकमान्य विद्यालयाचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे खेलो इंडिया चंद्रपूर चे वतीने महिला व मुलींची मैदानी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकाने यश प्राप्त केले.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिनांक ८ मार्च २०२६ ला पार पडलेल्या मैदानी स्पर्धेत येथील कु.लक्ष्मी शंकर दाते या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका दिपाली वाघरे यांनी सुद्धा यश प्राप्त केले.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य रूपचंद धारणे, उपप्राचार्य प्रफुल वटे, पर्यवेक्षक आशुतोष सुरावार, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, मार्गदर्शिका चंदा लोहकरे,राजकुमार हातझाडे, विकास मोहिते,किशोर किरमिरे, सचिन मेश्राम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



