वारंवार अपघाताला आमंत्रण देणाऱ्या मानोरा फाटा येथे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात यावी
नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचे बांधकाम कार्यकारी अभियंत्यास निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील अवजड वाहतूक समस्या दिवसोंदीवस अधिक गंभीर व जीवघेणी होत आहे. दिनांक १० रोजीअपघाताची पुनरावृत्ती झाल्याने या फाट्या वरील पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपुर चंद्रपूर हायवेला मनोरा फाटा जमगट हॉटेल जवळ एकदा नव्हे तर वारंवार होत असलेल्या अपघात मुळे जीवित हानी होत आहे.मात्र बांधकाम विभाग वा सबंधित यंत्रणेने अजूनही उपाययोजना केली नाही.
त्याअनुषंगाने भद्रावती चे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता श्री पगारे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर विभाग १ यांना निवेदन देण्यात आले. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले. यावेळी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचेसह नगरसेवक देवेंद्र गडपाले,योगेश गाडगे, राहुल सोनटक्के तसेच नगरपरिषद बांधकाम सभापती मंगेश सोनुलकर हे उपस्थित होते



