ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुक्तांची विविध प्रभागात प्रत्यक्ष भेट

नागरी सुविधांची पाहणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :– शहरातील नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी विविध प्रभागांना सकाळी लवकर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दिनांक १० मार्च रोजी एकोरी प्रभागात तसेच ११ मार्च रोजी हिंदुस्थान लालपेठ प्रभागात सकाळी ७.०० वाजता भेट देत परिसरातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

या भेटीदरम्यान संबंधित प्रभागातील नगरसेवक, सहाय्यक आयुक्त तसेच बांधकाम, पाणीपुरवठा, अतिक्रमण, स्वच्छता आणि विद्युत विभागातील अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी परिसरातील रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, अतिक्रमणाची स्थिती तसेच इतर मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत स्थानिक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी अशा प्रकारे प्रभागस्तरावर नियमित पाहणी करण्यात येणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये