चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगारांना अवघ्या काही तासात निष्पन्न करुन ११ गुन्हे उघडकीस
एकुण 20 लाख 90 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 09/03/2028 रोजी सायंकाळी 06.45 वा. पासुन ते रात्री 08.40 वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावंगी मेघे, वर्धा शहर व रामनगर परिसरात तिन चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या यासंबंधाने तिन्ही पोलीस स्टेशन ला भारतीय न्याय संहिता कलम 304 (2). 3 (5) भान्या.सं. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

सदर तिन्ही गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक, वर्षा श्री. सदाशिव वाघमारे यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरीता त्याचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे चार पथक तयार करुन ज्या तिन ठिकाणी चैन स्नॅचिंग झाली आहे त्याचे रोड मैप तयार करून त्या मार्गावरील सर्व सिसिटिव्ही फुटेज तसेच नियंत्रण कक्ष, वर्धा येथील कॅमेरांची पाहणी करुन आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले व AI चा उपयोग करुन त्या फुटेज मधील चेहरे स्पष्ट करण्यात आले. तसेच वेगवेगळ्या जागेचे मोबाईलचे तांत्रिक पडताळणी करुन गुन्हयातील एक आरोपी सराईत गुन्हेगार हसनैन उर्फ हसन अली जाफर अली, वय 21 वर्ष, रा. भुसावळ, जि. जळगांव यास निष्पन्न करण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र राज्यात चैन स्नॅचिंगचे बरेच गुन्हे नोंद आहेत व तो जळगांव जिल्हयातील पाच गुन्हयात काही महिन्यापासुन फरार असुन स्वतःची ओळख लपवून वेगवेगळया ठिकाणी वास्तव्यास राहत असल्याची माहिती प्राप्त केली त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन वेगवेगळे पथक भोपाळ व बैतुल, मध्यप्रदेश या ठिकाणी पाठविण्यात आले.

तेथुन आरोपी हा काही दिवसांपासुन अमरावती येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही पचकांनी अमरावती येथे आरोपी हसन अली याचा शोध घेवून आरोपी हसन अली यास शिताफिने ताब्यात घेत असतांना आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करून लगेच त्यास ताब्यात घेतले यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाने हसन अली यास विचारपुस केली असता आरोपीने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली आरोपीस विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता आरोपीने वर्धा जिल्हयामध्ये पोलीस स्टेशन पुलगांव हद्दीत सन 2024 मध्ये दोन चैन स्नचिंगचे गुन्हे, पोलीस स्टेशन रामनगर मध्ये सन 2025 मध्ये 3 चेन स्नचिंगचे गुन्हे व दि 09/03/2026 रोजी तीन चैन स्नचिंगचे गुन्हे तसेच यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. 10/03/2026 रोजी एक चैन स्नॅचिंगचा गुन्हा तसेच माहे फेब्रुवारी 2026 मध्ये मंडला, मध्य प्रदेश येथे एक चैन स्नधिंगचा गुन्हा असे एकुण 10 चैन स्नैचिंग चे गुन्हे केल्याची माहिती दिली.
सदर गुन्हयांपैकी सन 2024 व सन 2025 चे वर्धा जिल्हयातील चैन स्नॅचिगचे गुन्हे आतंक उर्फ सादिक इबादत अली, वय 32 वर्ष, मुसावल, जि. जळगांव याचे सोबत केले असुन सन 2026 चे चैन स्नॅचिंगचे गुन्हे हे त्याचा सेंधवा, मध्य प्रदेश येथे राहणारा मित्र मोहंमद अली हैदु अली याचे सोबत केल्याची माहिती दिली तसेच आरोपीने गुन्हयात वापरण्यात येत असलेली मोटर सायकल दि. 11/06/2025 ला पोलीस स्टेशन चुनाभट्टी, भोपाल मध्य प्रदेश हद्दीतुन बजाज पल्सर 200 हि मोटर सायकल चोरी करुन सदर मोटर सायकलने सन 2026 मध्ये चैन स्नॅचिंग चे गुन्हे केले आहे. आरोपीने सन 2024 व सन 2026 मध्ये केलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील मुद्देमाल स्वतः, पत्नी सुखैना अली व आरोपी मोहंमद अली हैदु अली याची बहिण सना अली रा. भोपाल, मध्य प्रदेश यांनी अमित खंडेलवाल, रामा ज्वेलर्स, बाडा, ग्वालियर रूय प्रदेश याचेकडे गहाण ठेवला होता. आणि सन 2025 चा मुद्देमाल हा आरोपी हसन अली याचा साथीदार आरोपी आतंक उर्फ सादिक इबादत अली, रा. भुसावल, जि जळगांव याने विकी केल्याची माहिती दिली. आरोपी आंतक उर्फ सादिक अली, रा. भुसावळ हा अटक होणे बाकी असल्याने सन 2025 मध्ये पो.स्टे. रामनगर हद्दीत घडलेल्या चैन स्नचिंगचा मुद्देमाल जप्त होने बाकी आहे. सदर गुन्हयात 126 ग्रॅम 370 मिलीग्रॅम सोने किंमत 18,45,000/- रु. तसेच दोन मोबाईल ज्यामध्ये एक आयफोन किंमत अंदाजे 60.000/- रु किंमत अंदाजे 35,000/- रु. एक बजार पल्सर मोटर सायकल किंमत अंदाजे 1.50,000/- रु असा एकुण जुकि 20,90,000/- रु. (विस लक्ष नव्वद हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने वरनमुद प्रमाणे जी मोटर सायकल चोरली होती ती फिर्यादीला घेण्याकरीता फक्त 7 दिवस झाले होते.
याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, वर्षा ने चैन स्नॅचिंगचे 10 व मोटर सायकलचा एक गुन्हा असे एकुण 11 गुन्हे उघडकीस आणले आहे
आरोपीने वर्धा जिल्हा, यवतमाळ व मंडला, मध्य प्रदेश येथे केलेल्या गुन्हयाची माहिती खालील प्रमाणे आहे.
याप्रमाणे चैन स्नॅचिंगचे 10 व मोटर सायकल चोरीचा एक असे 11 गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडून उघड करण्यात आले आहे. हसन अली हा अट्टल गुन्हेगार असुन आंतर राज्यामध्ये गुन्हे करण्यात सकिय आहे सदर आरोपी हा जळगांव जिल्हयातील खालील नमुद प्रमाणे चेन स्नॅचिंगच्या एकुण पाच गुन्हयामध्ये फरार आहे.
1) पो.स्टे अमळनेर अप.क. 538/25, कलम 304 (2), 3 (5) भा.न्या.सं.
2) पो.स्टे. पाचोरा अप.क. 482/25, कलम 304 (2) 3 (5) भान्या.सं.
3) पो. स्टे जिल्हापेठ अप.क. 276/25, कलम 304 (2), 3 (5) नान्या.सं
4) पो.स्टे. चाळीसगांव शहर 442/25 कलम 304 (2), 3 (5) भा.न्या.स.
5) पो.स्टे. पाचोरा अपक. 16/26. कलम 304 (2), 3 (5) भा.न्यासं
याप्रमाणे सदर आरोपी हा जळगांव जिल्लायातील चैन स्नॅचिंगच्या 5 गुन्हयात फरार असुन
त्याचे विरुध्द वेगवेगळ्या जिल्हयात एकुण 18 गुन्हे नोंद आहे.
सदर कामगिरी मा पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल व मा अपर पोलीस अधीक्षक, वर्षा श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो उपनि विजयसिंग गोमलाडू पो हवा नरेन्द्र पाराशर, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरगे, संजय राठोड, भुषन निघोट, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, पोलीस अंमलदार अमोल नगराळे, दिपक साठे, मिथुन जिचकार, मंगेश चवरे, सुगम चौधरी, शुभम राऊत, अरविंद इंगोले सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तसेच सायबर शाखेचे पोलीस अंमलदार दिनेश बोधकर, गोविंद मुंडे, अक्षय राऊत, स्मिता महाजन चालक पो हवा अखिल इंगले, रितेश गेटमे यांनी केली



