दारू पिवून वाहन चालविणा-या चालकांवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 18/03/2026 रोजी वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील मार्शल 1 व 2 या दोन्ही यांनी मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार पोहया शब्बीर सैयद ब.क 814, पोशि दिलीप कामडी 163, पोहवा मुकेया राऊत 1265 पोहया चंद्रकांत तपासे ब.क 1492, पोशि प्रदीप कोहळे ब.क 983 तसेच सफौ धिरज पांडे 830 मपोशि प्रज्ञा नाखले 1565 हे पोस्टे ऑफीस चौक येथे डयुटीवर असतांना त्यांनी वाहने चेकींग केली असतांना सदर बाहन क MH 30 AB 7183 चा चालक याने आपले वाहने निष्काळजीपणे पध्दतीने चालवितांना मिळून आल्याने सदर वाहन चालक नाने 1) अर्जुन बी पानसे रा. बेतुल हा दारू पिवुन असल्याचा संशय आल्याने सदर वाहन चालकास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणुन त्यांचे ब्रिथ अॅनालाईझर ने दारू पिवुन असल्याचे चेक केले असता त्यांचे रक्ता मध्ये 291.9 एमजी अल्कहोलचे प्रमाण मिळून आले त्यांचेवर 185 मोवाका अन्यये पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदरचे वाहन हे वर्धा श येथे जमा करण्यात आले.
पो.नी. विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दारू पिवुन वाहन चालवु नये असे सर्वांना नागरीकांना आव्हान केले आहे.



