ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोळाव्या शतकातील श्रीराम मूर्ती पुर्नप्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शहरातील माळीपुरा येथील श्री श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने सोळाव्या शतकातील पुरातन श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यामध्ये १६ व्या शतकातील श्रीराम मूर्तीची पुर्नप्राणप्रतिष्ठा सोबतच पुरातन गणपती व दास मारुती कोरीव पाषाण मूर्ती, शिवलिंग, मुंजा देवता या मूर्तींची पुर्नप्राणप्रतिष्ठा जालना येथील आनंदवाडी श्रीराम मंदीराचे वे.मु. रामदास आचार्य गुरुजी यांच्या हस्ते, वे.मु.विनोद वैजुडकर, वे.मु. कृष्णराव सुरडकर, अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेत सहभागी वे.मु. चंद्रशेखर भोगे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली वेद संपन्न ब्राम्हणवृंदाच्या वेदमंत्र घोषात करण्यात आली. प्रसंगी प्रल्हाद महाराज यांच्या पादुका आगमणाने वातावरण आनंदमय झाले.

सोळाव्या शतकात सावखेडभोई (मारुती पेठ/ मुजुमनगर) येथे संत जनार्दन स्वामी यांच्या हस्ते स्थापित श्रीराम मंदिर कालांतराने श्री बालाजी महाराजांच्या नवीन वसलेल्या देऊळग्रामात इ.स. १७१० मध्ये पुर्नप्राणप्रतिष्ठित झाले. सदर मंदिराचे १९६१ मध्ये जोशी यांच्या घराण्यातील पंचांनी ट्रस्टसाठी अर्ज सादर केला व १९६३ ला ऄ-५०० या रजिस्ट्रेशन नंबरने हे श्री श्रीराम मंदिर ट्रस्ट अस्तित्वात आले. फाल्गुन वद्य दशमी ते द्वादशी या त्रयदिन जिर्णोद्धार सोहळ्याची सुरुवात दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वा वाजता शोभायात्रा व जल यात्रेने झाली. तसेच विविध धार्मिक विधी, पूजन, स्नपन, अभिषेक, कलशारोहण, यज्ञयाग व पुर्नप्राणप्रतिष्ठा, कीर्तन व भजन कार्यक्रम संपन्न झाले. यामुळे परिसरातील वातावरण भक्तीमय झाले. वेदमूर्ती उद्बोध महाराज पैठणकर यांचे कीर्तन तसेच वेदमूर्ती रामदास आचार्य यांचे प्रवचन व ह.भ.प. संतचरणदास निकम गुरुजी यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर धार्मिक विधी सोहळ्यास माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, तुकारामभाऊ खांडेभराड, धनश्रीराम शिपने, राजेशजी भुतडा, राजेशभाऊ खांडेभराड, गोविंद भाऊ झोरे व ज्येष्ठ पत्रकार सुरज गुप्ता यांनी विशेष भेट दिली.

या सोहळ्यासाठी बालाजी महाराज संस्थान, नरहरी महाराज संस्थान, संत सावता महाराज मंदिर समिती, मारुती सेवा समिती, संत गजानन महाराज मंदिर कुंभारी तसेच उंबरखेड, पांगरी, किन्ही, पिंपळगाव चिलमखाँ, पिंपळनेर व देऊळगाव राजा येथील वारकरी व भजनी मंडळाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर ट्रस्ट माळीपुरा यांचे समस्त विश्वस्त, जोशी परिवारांचे समस्त सदस्य यांनी केले व समस्त श्रीराम भक्तांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये