अवैद्य रेती तस्करावर महसूल विभागची धडक करवाई
उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांचे सर्जिकल स्ट्राइक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या चर्चा सुरू असतानाच महसूल विभागाने मौजा गवराळा येथे दि. १७ मार्च २०२६ रोजी रात्रो ९.१५ वाजताच्या सुमारास गवराळा परिसरात धड़क कारवाई केली.
मिळालेल्या महितीनुसार मौजा चिरादेवी नाल्यातून रेती भरलेले ट्रॅक्टर सूमठाणा गावाजवळ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
उपविभागीय अधिकारी वरोरा संदीप भस्के यांनी स्वतः कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कारवाई दरम्यान, गवराळा भद्रावती येथील रितेश बुचे यांचे ट्रॅक्टर विनापरवाना रेती वाहतूक करताना आढळल्याने ते जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली.
या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक यांना पाचारण करण्यात आले होते. जप्त केलेले ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तरीही दुसरीकडे मांगली (रै) नाल्यासह काही नदी-नाल्यांमधून चारगाव घाट, कोंडा नाला चंदनखेडा व पारोधी घाट वाघेडा, चोरा,रात्री ट्रॅक्टरची ये-जा सुरू असल्याच्या चर्चा स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत.



