मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदार संघातील ज्वलंत समस्या त्वरीत दूर करा
अनिल सावजी यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात अत्यंत महत्त्वपूर्ण, लोकांच्या जीवनाशी निगडीत काही समस्या असून त्या तातडीने दूर कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी उप नगराध्यक्ष अनिल सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
देऊळगाव राजा येथील भारतीय स्टेट बँक चे चलन पुरवठा कोणतेही कारण नसताना बंद करण्यात आले आहे, त्यामूळे येथील उद्योग धंद्यावर व उद्दोजकावर फार मोठा परिणाम झाला आहे, अनेक उद्योजकांना या बँकेचे व्यवहार करणे कठीण झाले आहे, तरी या बँकेचा चलन पुरवठा त्वरीत सुरू करण्यासाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिवांच्या मार्फत आर बी आय कडे कारवाई करावी.
देऊळगाव राजा शहर हे विद्येचे माहेर घर असून श्री बालाजी महाराजा ची पुण्य नगरी असून या ठिकाणी वारकरी संप्रदाय करीता श्री नरहरीनाथ महाराज संस्थान तर्फे संस्कृत विद्यालय विना अनुदान तत्वावर सुरू असून या ठिकाणी शासनाच्या वतीने संस्कृत विद्यापीठ सुरु करण्यात यावे.
देऊळगाव राजा येथे अनेक न्यायालीन प्रकरणे प्रलंबित असून जिल्ह्याचे ठिकाण 90 किलोमीटर अंतरावर असल्याने या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय टप्पा 1व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करावे.1981,82 मध्ये तत्कालीन मुख्य मंत्री श्री अंतुले यांनी सिंदखेड राजा येथे मंजूर केलेली जिजामाता मुलींची सैनिक शाळा सुरू करण्यात यावी.
सिंदखेड राजा हे ऐतिहासिक शहर असून मातृतीर्थ माँ जिजाऊ साहेबांचे माहेरघर असून या ठिकाणी अनेक पर्यटक देश विदेशातून येत असतात परंतु त्यांना राहण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही त्यामूळे या ठिकाणी पर्यटन महामंडळ च्या जागेवर भव्य रिसोर्ट उभारण्यात यावे.
सिंदखेड राजा येथे एम आय डी सी मंजूर करण्यात आली असून मात्र विकसित करण्यात आलेली नाही तेव्हा विकसित करावी नवीन उद्योग सुरू करण्यात यावे.
देऊळगाव मही येथे सुसज्ज बस स्थानक उभारण्यात यावे.
देऊळगाव राजा येथील एम आय डी सी क्षेत्रात नव्याने खडकपूर्णा धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे मात्र काम सुरू झाले नाही, तेव्हा तात्काळ काम सुरू करण्यात यावे, तसेच सर्व्हिस रोड चे काम सुरू करण्यात यावे.
देऊळगाव राजा येथे लघु एम आय डी सी असल्याने नवीन भूखंड नाही त्याकरिता याठिकाणी 50 एकर शासकिय जमीन उपलब्ध आहे ती जमीन संपादित करून नवीन भूखंड उपलब्ध करुन देण्यात यावे.
देऊळगाव राजा येथे मंजूर 33असलेले केव्ही सब स्टेशन सुरू करण्यात यावे.
देऊळगाव राजा येथे खडकपूर्णा धरणातून 3 पाणी पुरवठा योजना सुरू असून 15 दिवसाने पाणी पुरवठा होत आहे, दररोज पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई करावी.
देऊळगाव राजा येथे शासकिय मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात यावे.
देऊळगाव राजा येथील बालाजी महाराज संस्थान येथे विश्वस्थ कायम ठेऊन पब्लिक ट्रस्ट नेमण्यात यावे.
देऊळगाव राजा येथील गजानन महाराज मंदिर ते जालना रोड बायपास पावेतो चार पदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे परंतु डिव्हायडर नसल्याने अपघात होत आहे, तेव्हा मंजूर करण्यात आलेले डिव्हायडरचे काम तात्काळ सुरू करून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात यावे.
देऊळगाव राजा येथे 100 खाटाचे उप जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात यावे,या मागणी चे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठविण्यात आले आहे. निवेदनावर माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे,शिवसेनेचे नेते छगनराव मेहेत्रे, काँग्रेस पक्षाचे नेते अनिल सावजी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.