निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे सरसावले
प्रकल्पग्रस्तात उमटली आशेची लहर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
येत्या २३ तारखेला राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या दालनात होणाऱ्या तातडीच्या बैठकी चे पूर्वनियोजन करण्याच्या दृष्टीने आज दिनांक २३ मार्च रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १४ रोजी न्यू. ग्रेटा एनर्जी लि. व न्यू. एरा क्लिंनटेक कंपनीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले मात्र भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चकार शब्दही बोलल्या गेले नाही . निराश व असंतोषाने खदखदत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना अखेरची घरघर लागल्याचे बोलल्या जाऊ लागले.
चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन नियोजन मंत्री आशिष जैस्वाल यांच्या समोर याचे लेखी निवेदनातून गांभीर्य मांडले. याची दखल घेऊन दिनांक २३ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता कक्ष ३१९ मंत्रालय मुंबई येथे प्रधान अपर सचिव, मुख्य सचिव, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, सबंधित विभागाचे अधिकारी व निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
त्यादृष्टीने पूर्वनियोजन म्हणून लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, नगर परिषद भद्रावती चे उपाध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त सुधीर सातपुते संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, संघटक मधुकर सावनकर, बंडू भादेकर, वासुदेव ठाकरे, श्रीकांत खिरटकर, सौरभ घागी, बाबा तराळे, सुरेश बदखल, तेजकरण बदखल, रवि बोडेकर, विलास डोये आदी उपस्थित होते.
प्रसंगी नेतृत्व व सहभागी मुद्दे यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करून निराश न होता यापुढेही आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी लढा सुरू राहील असे ठणकावून सांगितले.
निप्पॉन उद्योगाचे हिरवे गाजर दाखवून तत्कालीन सरकारने घोर निराशा करून आम्हाला देशोधडीला लावले. यावेळी महायुती सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना बगल देत अक्षरशः तोंडाला पाने पुसली. मात्र लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी पाठपुरावा करून मुंबई येथे मंत्रालयात बैठक लावली यामुळे एक नवीन आशेची पालवी फुटली आहे.
*विलास डोये, प्रकल्पग्रस्त तथा सामाजिक कार्यकर्ते*



