ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विक्रांत सहारे यांच्या तक्रारीनंतर अमृतच्या कामाचे नियमानुसार खोदकाम सुरु

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ शहर महानगरपालिका हद्दीत सुरु असलेल्या अमृत योजना फेज २ मध्ये नियमबाह्य कामे केल्याचा ठपका युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी ठेवला होता. पाईपलाईन नियमबाह्य पद्धतीने टाकण्याचे काम शहरातील बंगाली कॅम्प व इंदिरानगर भागात सुरु होते. विक्रांत सहारे यांच्या तक्रारीनंतर मनपा आयुक्तांनी कामाची झडती घेतली होती. आज १९ मार्चपासून नियमाच्या अधीन राहून लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे पुन्हा पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले असून यावर सहारे यांनी मनपा आयुक्तांचे आभार मानले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत अमृत योजना फेज २ चे कामे सुरु आहे, नियमाप्रमाणे कंत्राटदाराला ३ फूट खोल खड्ड्यात पाईपलाईन टाकायची आहे मात्र कंत्राटदार वेळ वाचवीत १ फूट खड्डा खोदून पाईपलाईन टाकत होता, यावर सहारे यांनी आक्षेप उचलत मनपा आयुक्त व जलप्राधिकरण यांच्याकडे तक्रार दिली, तक्रार दिल्यावर दोनदा मनपा व जल प्राधिकरणाला २ वेळा स्मरणपत्रही देण्यात आले मात्र त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही.

अखेर सहारे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना कामात काय घोळ होत आहे त्याबाबत पुराव्यासह माहिती दिली, २ दिवसांनी आयुक्त अकनूरी नरेश यांनी पाहणी करीत कंत्राटदार व जल प्राधिकरण अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले, सहारे यांच्या तक्रारीमुळे बंगाली कॅम्प व इंदिरानगर मधील अमृत योजनेचे काम पुन्हा नव्याने खड्डे खोदून होत आहे, यावर सहारे यांनी आयुक्तांचे आभार मानले असून शहरात कुठेही नियमबाह्य कामे होत असतील तर त्याबाबत युवासेनेकडे तक्रारी कराव्या आम्ही आमच्या पद्धतीने प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये