समर्थ कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व राष्ट्राभिमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नंदाताई कायंदे, संस्थेचे सचिव सतीश कायंदे, डॉ विजया कायंदे, वर्षा कायंदे, गबाजी कुटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्राचार्य डॉ प्रफुल्ल ताठे, प्राचार्य सचिन घुगे यांची प्रमुख उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्ष नंदाताई कायंदे व सचिव सतीश कायंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे भाषण प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी दिले. त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व कृषी क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासात युवकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले.
तसेच महाविद्यालयात पोषण पंधरवाडा निमित्त घेतल्या गेलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा यामधील शितल शैलेंद्र सोमनकर, तृप्ती दिपक पारस्कर, तृप्ती गणेश मुंढे, अंजली नितीन वायाळ, प्रणव नरेंद्र देशमुख, साक्षी भानुदास जाधव, प्रेशिका दिनेश जाधव, ओम खंदारे, आयुष येलने, तेजस सपकाळ, आशिष लोखंडे या विजेत्या विद्यार्थ्यास पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल संजय लाड व विनोद भालेराव यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष नंदाताई कायदे व सचिव सतीश कायंदे यांनी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा अश्विनी जाधव यांनी केले. या ध्वजारोहण सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.