ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परसोडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीवर कार्तिकजी गोन्लावार यांची बिनविरोध निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

परसोडा : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीवर युवा सामाजिक कार्यकर्ते कार्तिकजी गोन्लावार यांची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या पार्श्वभूमीवर कार्तिकजी गोन्लावार यांची समितीवर निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनिर्वाचित समिती सदस्यांनी शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच शाळेतील विविध मूलभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये