जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडा येथे रक्षाबंधन उत्साहात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
परसोडा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, परसोडा येथे आज दि. २९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व जाणून घेत एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी व बंधुभाव व्यक्त केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश वरगंटीवार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्तिकजी गोन्लावार, अमोल मेश्राम सर, काटकले मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. विकास भोयर, श्री. प्रकाश रामटेके, श्री. विकास सिडाम, श्री. प्रमोद मेश्राम, श्री. विनोद राऊत, श्री. गणपत बोकडे, श्री. प्रमोद अगिरकर, श्री. हरिभाऊ मडावी आणि सौ. तेजू अगिरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व परंपरांविषयी जिव्हाळा निर्माण करण्यासोबतच प्रेम, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



