ब्रम्हपूरीत काॅंग्रेसच्या वतीने मतदारांच्या हक्कांसाठी आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
दि. २५ जानेवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशातील मतदार निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावीत असतात. भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाकडून भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणात सर्व निवडणूका पार पडणे अत्यंत महत्वाचे व आवश्यक आहे.
निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे, त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ब्रम्हपूरी काॅंग्रेसच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. व त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले.
यावेळी तालुका काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी पं.स.सदस्य डॉ.थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्ष योगिता आमले, कृउबा उपसभापती सुनिता तिडके, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, कृउबा संचालक अरुण अलोने, कृउबा संचालक ब्रम्हदेव दिघोरे, माजी नगरसेवक सागर आमले, जिल्हा काॅंग्रेस सचिव गुड्डु बगमारे, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, तालुका काँग्रेस सचिव सतीश डांगे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, जिल्हा काॅंग्रेस सरचिटणीस प्रा.डि.के.मेश्राम, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष प्रा.चंद्रशेखर गणवीर, विजय राऊत, राममोहन ब्राडीया, इनायत खा पठाण, सुनील विखार, पथविक्रेता संघटना सदस्य भजगवळी, नेताजी पीसे, सोमेश्वर उपासे, जनार्दन रामटेके, डेनी शेंडे, शांताराम रामटेके, महीला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष सुधा राऊत, महीला काँग्रेसच्या शहर सचिव सुशीला सोंडवले, शालु राऊत, सुरेखा गजभीये यांसह काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.