ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड.एस.आर. उपक्रमांतर्गत बैलमपूर येथे ग्रामीण महिला कबड्डी स्पर्धा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ग्रामीण स्तरावरील महिला कबड्डी स्पर्धेत महिलांनी दमदार प्रदर्शन केले. बैलमपूर येथे आयोजित ही स्पर्धा संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरली. ही स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बैलमपूरच्या मैदानावर पार पडली.

ही स्पर्धा माणिकगढ सिमेंट वर्क्स यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन माणिकगड सिमेंट वर्क्सचे अधिकारी मानस बेहेरा (एडमिन) यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ नवीन कौशिक (डिपार्टमेंट हेड एडमिन, ईआर) यांच्या हस्ते पार पडला. सीएसआर पथकाच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत कौशल्यपूर्ण आणि परिश्रमपूर्वक यशस्वीरीत्या पार पडला. ग्रामीण नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.

यानंतर ग्रामस्तरावरील जनप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. बैलमपूरचे उपसरपंच अशोक चांदेकर, पेसा अध्यक्ष रेखा कोडापे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनीता परचाके, नोकारीचे उपसरपंच वामन तुराणकर, मानोलीचे उपसरपंच गणेश नैताम तसेच बैलमपूरचे तंटामुक्ती अध्यक्ष बादल चांदेकर हे मान्यवर उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून जिल्हा परिषद शाळा बैलमपूरचे मुख्याध्यापक कनिराम पवार, शिक्षक विनोद चव्हाण तसेच लक्ष्मण किरवले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निष्पक्ष निर्णय व मार्गदर्शनामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

या स्पर्धेत नोकारी, बैलमपूर, जामनी, गोवारीगुडा आणि मानोली गावांतील एकूण ४८ महिलांनी सहभाग घेतला. सहभागी महिलांचे वय २५ ते ४० वर्षे दरम्यान होते. ग्रामीण महिलांचा उत्साह, आत्मविश्वास आणि क्रीडाभावना अत्यंत कौतुकास्पद होती.

या क्रीडा सोहळ्यात सीएसआरतर्फे सर्व सहभागी महिलांना खेळ पोशाख देण्यात आले, ज्यामुळे महिलांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.

स्पर्धेत बैलमपूर संघ विजेता ठरला, तर नोकरी संघ उपविजेता ठरला. दोन्ही संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या प्रगतीचे प्रतीक ठरला आहे. क्रीडामाध्यमातून त्यांनी सिद्ध केले की वय अडथळा नसून जिद्द आणि परिश्रम हीच खरी ताकद आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये