ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मासळ विसापूरचे माजी सरपंच भोलाजी पाटील टोंगे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील मासळ (विसापूर) येथील माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य तसेच उत्तम भजन गायक म्हणून ओळख असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व भोलाजी पाटील टोंगे यांचे शनिवार दि.२१ फेब्रुवारीला पहाटे साडे ४ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनावेळी त्यांचे वय ८३ वर्षे होते.
गावाच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे मासळ विसापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर अंतिम संस्कार शनिवारला दुपारी १२ वाजेच्या सुमारास मासळ विसापूर येथे करण्यात आला.



