ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरु रविदास साहित्य संमेलनात ‘मी रमाई बोलते’ सादरीकरणाला गौरव

भद्रावतीच्या बालिकेचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         वीर ककय्या, गुरु रविदास, संत सेवालाल तथा माता रमाई जयंतीनिमित्त विश्व गुरु रविदास समता परिषद सामाजिक प्रतिष्ठाण, नांदेड यांच्या वतीने आयोजित ८ वे अखिल भारतीय एक दिवसीय गुरु रविदास साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.

या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. यामध्ये भद्रावती शहरातील शिपा मंगेश पवार या बालिकेने ‘मी रमाई बोलते’ या एकपात्री नाटिकेत प्रभावी अभिनय सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

तिच्या उत्कृष्ट अभिनयाची दखल घेत संमेलनातील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शिपा पवार हिला सन्मानित करण्यात आले.

या यशामुळे भद्रावती शहरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिचे कौतुक करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये