ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईनचे केलेल्या कामगीरी

वर्धा जिल्हयामध्ये"दामिनी" व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक ७६२०५२००२५ उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा जिल्हयामध्ये महिला व मुलींचे संरक्षणाकरिता दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. दामिनी पथक हे शाळा, महाविदयालये, मुलींचे व महिलांचे वस्तीगृह बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, प्रेक्षनिय स्थळे, खाजगी क्लासेस, मोकळे मैदाने, इत्यादी ठिकाणी भेटी देवुन महिला व मुलींच्या मदतीसाठी हजर येतात हया अनुसरुन महिलांना व मुलींना सोईकरीता किंवा त्यांची तक्रार गोपनीय राहिल या करीता वर्धा जिल्हयात मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब यांच्या आदर्श संकल्पनेतुन नव्याने दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुट करण्यात आली आहे दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईनव्दारे वरील सर्व मदत महिलांपर्यंत पोहचविण्याकरीता दिनांक ३१.०८.२०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी मॅडम व मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब यांच्या हस्ते दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईनचे उदघाटन करण्यात आले होते.

सदर हेल्पलाईन सुरु झाल्यापासुन ३९ तक्रार नोंदविण्यात आले असुन सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले असुन सदर तक्रारींमध्ये महिलांचे कौटुंबीक हिंसाचार, महिला सुरक्षा, जेष्ठ नागरीक तसेच इतर प्रकारच्या तक्रार प्राप्त झाल्या आहेत. दिनांक २४.०९.२०२६ रोजी दामिनी हेल्पलाईनवर प्राप्त कॉलवरुन दामिनी पथकाने घटनास्थळी पोहचुन पिडीतेस मदत करुन तिला तिचे पालकासह पोलीस स्टेशन रामनगर येथे पुढील कार्यवाही करीता नेवुन देण्यात आले होते. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रारदाराचे तक्रारीवरुन दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दामिनी हेल्पलाईनवर प्राप्त सर्व तक्रारींची दखल घेवुन संबंधीत पोलीस स्टेशनला पाठवुन संबंधित तक्रारीवरुन दखलपात्र किंवा अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. तसेच सदर तक्रारीबाबत पाठपुरावा सुध्दा घेण्यात येतो.

> वर्धा शहरातील नागरीकांकडुन शहरातील काही परिसरात तसेच कोचींग क्लासेसचे बाहेरील परिसरात पोलीस गस्त वाढविण्याबाबतचे कॉल प्राप्त झाल्यावरुन सदर ठिकाणी दामिनी पथक तसेच संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुध्दा सदर ठिकाणी अधिक प्रभावीपणे गस्त करीत आहेत.

वर्धा जिल्हयातील सर्व शालेय व महाविद्यालयातील विदयार्थीनी यांनी” दामिनी” व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांक ७६२०५२००२५ चा संकटाचे वेळी उपयोग करावा तसेच विदयार्थीना कुठे सुरक्षित न वाटल्यास हेल्पलाईनवर एक व्हॉट्सअॅप मॅसेज करुन सविस्तर माहिती दयावी जेणेकरुन आपणास मदत करता येईल असे आवाहन आम्ही सपोनि माधुरी वाघाडे भरोसा सेल / दामिनी पथक प्रमुख व्दारे करीत आहे.

पोहचुन पिडीतेस मदत करुन तिला तिचे पालकासह पोलीस स्टेशन रामनगर येथे पुढील कार्यवाही करीता नेवुन देण्यात आले होते. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रारदाराचे तक्रारीवरुन दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दामिनी हेल्पलाईनवर प्राप्त सर्व तक्रारींची दखल घेवुन संबंधीत पोलीस स्टेशनला पाठवुन संबंधित तक्रारीवरुन दखलपात्र किंवा अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. तसेच सदर तक्रारीबाबत पाठपुरावा सुध्दा घेण्यात येतो.

 वर्धा शहरातील नागरीकांकडुन शहरातील काही परिसरात तसेच कोचींग क्लासेसचे बाहेरील परिसरात पोलीस गस्त वाढविण्याबाबतचे कॉल प्राप्त झाल्यावरुन सदर ठिकाणी दामिनी पथक तसेच संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुध्दा सदर ठिकाणी अधिक प्रभावीपणे गस्त करीत आहेत.

वर्धा जिल्हयातील सर्व शालेय व महाविद्यालयातील विदयार्थीनी यांनी” दामिनी” व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांक ७६२०५२००२५ चा संकटाचे वेळी उपयोग करावा तसेच विदयार्थीना कुठे सुरक्षित न वाटल्यास हेल्पलाईनवर एक व्हॉट्सअॅप मॅसेज करुन सविस्तर माहिती दयावी जेणेकरुन आपणास मदत करता येईल असे आवाहन आम्ही सपोनि माधुरी वाघाडे भरोसा सेल / दामिनी पथक प्रमुख व्दारे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये