ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प. उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे ओंकार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व सिलिंग फॅन भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे भाषा विषय शिक्षिका कु. मंदा उद्धव उरकुडे यांचे सुपुत्र ओंकार वसंत गोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच वर्गखोलीसाठी एक दर्जेदार सिलिंग फॅन शाळेला सप्रेम भेट देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वाढदिवसानिमित्त ओंकार गोरे यांचा सत्कार करून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना उदंड व निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यानंतर शाळेसाठी दिलेली सिलिंग फॅनची भेट शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विनोदजी क्षीरसागर सर, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी सन्मानपूर्वक स्वीकारली. सोबतच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान मुख्याध्यापक विनोदजी क्षीरसागर यांनी बोलताना सांगितले की, “वाढदिवसासारख्या कौटुंबिक आनंदोत्सवात अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे व शाळेला उपयुक्त वस्तू भेट देणे हा अतिशय कौतुकास्पद आणि प्रेरणादायी विचार आहे.”

कार्यक्रमादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी ओंकार गोरे यांच्या मातोश्री तथा शाळेच्या शिक्षिका कु. मंदा उरकुडे, शाळेतील सर्व शिक्षक आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून उरकुडे कुटुंबियांचे कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये