ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. १२७०/१६ कलम ३७६ (२) (N), ३९४ भादंवि मधील आरोपीस शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

विद्यमान मा. श्री. धनराज काळे, सत्र न्यायालय १ हिंगणघाट यांनी पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. १२७०/१६ कलम ३७६ (२) (N), ३९४ भादंवि मध्ये आरोपी अंकुश उर्फ सोम्या महादेव सलामे, वय ३६ वर्षे, रा. सावली सास्ताबाद ता. जि. वर्धा यांस खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षेचा तपशील :-

१. कलम ३७६ (२) (N) भादंवि मध्ये १० वर्षे सश्रम कारावास व ५०००/-रू. दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा.

घटनेचा थोडक्यात तपशील :-

यातील फिर्यादी/पिडीत ही तरोडा बस स्टेंड ते तरोडा पारधी बेड्याचे मध्यभागी असलेल्या शाळेजवळ उभी असतांना आरोपी याने फिर्यादीस तुला वर्धेला सोडून देतो असे म्हणून त्याचे मोटार सायकलवर बसवून घेतले. आरोपी याने पिडीत हिला रोडच्या बाजूला असलेल्या नालीतील गवतात घेवून गेला, आरोपी याने पिडीतेला जबरदस्तीने दारू पाजून व मारहाण करून तिचेशी दोन वेळा जबरीने संभोग केला. तसेच आरोपीने पिडीतेचा वापरत असलेला मोबाईल फोन व नगदी २०००/-रू. जबरीने हिसकावून घेतले. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. १२७०/१६ कलम ३७६ (२) (N), ३९४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय नाईक पो.स्टे. हिंगणघाट यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. दिपक वैद्य यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार मपोहवा/रंजना झिलपे, ब.नं १२२८ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाचो कामगिरी बजावली आहे. तसेच पो. नि. अनिल राऊत ठाणेदार पो. स्टे हिंगणघाट यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफोंग करून योग्य मार्गदशन केले आहे. विद्यमान मा. श्री. धनराज काळे, सत्र न्यायालय १ हिंगणघाट यांनी गुन्ह्यातील आरोपी यास कलम ३७६ (२) (N) भादंवि मध्ये १० वर्षे सश्रम कारावास व ५०००/-रू, दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये