ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने 01 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंतची अवैध दारूविक्री धंदा करणाऱ्या विरुध्दची कार्यवाही

एम.ए.शेख निरीक्षक व भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांनी आरोपी कडून 11,10,910 रुपयांचा दारुचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो व वर्धा जिल्हा म्हटले तर दारू बंदी जिल्हा म्हणून ही ओळखले जात तरी वर्धा जिल्ह्यात सर्वात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असल्याचे दिसून आल्याने या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या वतीने दारू मुक्ती योजना राबविण्यात आले आहे याच अनुषंगाने 01 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत वर्धा जिल्ह्यातील वर्धा तहसील हिंगणघाट तहसील देवळी तहसील आर्वी तहसील येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारू विक्री धंदा करणाऱ्या विरुध्दोधात 29 जागी प्रोरेड करण्यात आले असून 20 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे यावेळी आरोपीवर कलम 65 ई,80,90,108 भारतीय संहिता कायदा 123 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून 11,10,910 रुपयांचा दारुसाठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यावेळी ही कार्यवाही वर्धा जिल्ह्याचे अधिक्षक संजय पाटील राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वर्धा जिल्हा चे निरीक्षक एम.ए.शेख नेतृत्वाखाली व त्यांचे भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक धनराज राऊत व यांचेसह सहकार्य करणारे कर्मचारी हरिदास सुरजुसे कुमारी सुजाता भारस्करे अमित नागमोते योगेश गावंडे या कर्मचाऱ्यांनाही मोलाची कामगिरी बजावली आहे यावरून अवैध दारू धंद्या करणाऱ्यावर सदर राज्य उत्पादन शुल्क विभागाची चांगलीच पकड असल्याचे दिसून येत आहे तसेच कोणास काही माहिती असल्यास मोबाईल नंबर 9579909343 या क्रमांकावर संपर्क साधान्याचे आवाहन एम.ए.शेख निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये