१३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी पोलिस भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ११/०२/२०२६ पासून दिनांक २३.०२.२०२६ पावेतो वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई) पोलीस भरती प्रक्रिया सुरु असुन दिनांक ११.०२.२०२६ पासुन आज दिनांक २१.०२.२०२६ पर्यंत पोलीस भरती प्रक्रियेतील शारिरीक मैदाणी चाचणीकरीता एकूण ६७९९ उमेदवार बोलविण्यात आले होते त्यापैकी आजपावेतो ५२११ उमेदवार प्रत्यक्षात हजर आले असुन शारिरीक मैदाणी चाचणीत ३३८३ उमेदवार पात्र ठरले आहेत.
तसेच दररोज पोलीस भरती करिता येणाऱ्या उमेदवारांना मैदानाजवळच नाश्ता, झेरॉक्स मशीन, फोटोग्राफरची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, अॅम्बुलंस, ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुदधा सोय करण्यात आली आहे.
तरी सर्व नागरीकांना व पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, जर कोणी आपणास पैशाची मागणी करुन पोलीस भरतीमध्ये लावून देण्याचे आमिष देत असल्यास अशा आमिषाला व भूलथापांना बळी पडु नये. संपुर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया ही निःपक्षपाती व पारदर्शक असुन संपूर्ण मैदान परिसरात cctv कैमेरे आणि व्हिडिओ कॅमेरांव्दारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे व चांगल्या वातावरणात राविण्यात येत आहे.
दिनांक २३.०२.२०२६ वार सोमवार हा शारिरीक मैदाणी चाचणी परिक्षेचा शेवटचा दिवस असुन, त्या दिवशी बोलविण्यात आलेले उमेदवार व ज्या उमेदवारांना काही कारणास्तव त्यांच्या विनंतीनुसार त्यांना दिनांक २३.०२.२०२६ ही तारीख दिलेली आहे, त्यांनी सदर तारखेस शारीरीक मैदानी चाचणीकरीता हजर राहावे. उमेदवारांना यानंतर पुढील तारीख देण्यात येणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.



