आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या उपस्थितीत गडचांदूर येथे संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बंजारा समाजाचे आदर्श क्रांतिकारी विचाराचे आदर्श दैवत मानले जाणारे’श्री संत सेवालाल महाराज यांची 287 जयंती १९ फेब्रुवारी रोजी सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान गडचांदूर तथा समस्त बंजारा समाज बांधवांच्या विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, संत सेवालाल महाराज मंदिरासाठी घेतलेल्या जागेच्या भव्य पटांगणावर संस्थांन चे अध्यक्ष श्री हितेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले .व्यासपीठावर बंजारा समाजाचे नायक बाबू मोतीराम पवार, समाजाचे कारभारी आबाजी चव्हाण, समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व पांडुरंग जाधव, नामदेव जाधव ,विकी राठोड शिवसेना शहरप्रमुख, गोविंद पवार गोर शीकवाडी व्याख्याते,पांडुरंग पवार, एम डी चव्हाण, बंडू राठोड ,भानुदास चव्हाण, यशोदाबाई जाधव, वंदना राठोड, चेतना राठोड, लक्ष्मण भाऊ, निवृत्ती चव्हाण मंडळ अधिकारी, महेश चव्हाण, दामोदर राठोड, इंजिनीयर संतोष राठोड, इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, संत सेवालाल महाराज ,डॉक्टर रामराव महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, काशिनाथ नाईक यांच्या प्रतिमेला पूजन करून, समाजाचे नायक कारभारी व समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते भोग अग्निहवन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, समाजातील ज्वलन समस्या, समाजाच्या विकासात्मक अडचणी शिक्षण आरोग्य पर्यावरणाची समस्या आणि बंजारा समाजाचे ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच बंजारा समाज बांधवांसाठी गडचांदूर येथे संत सेवालाल महाराज भवनाच्या निर्मितीसाठी 25 लक्ष रुपयाचे अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन आमदार दादा देवराज भोंगळे यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणातून दिले. संस्थांन चे अध्यक्ष श्री हितेश चव्हाण यांनी संस्थांन च्या माध्यमातून तीन वर्षापासून संस्थांन ची प्रगती आणि भविष्यातील योजना व अंमलबजावणी याविषयी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक श्री पांडुरंग जाधव यांनी समाजातील शिक्षण आरोग्य, शेती व्यवसायावर प्रकाश टाकला, श्री गोविंद पवार गोरसिकवाडी व्याख्याते यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, संस्थांन चे कोषाध्यक्ष कणीरामजी पवार यांनी मागील तीन वर्षभरातील कार्य तथा संस्थान चे कार्य विशद केले, या दिनाच्या औचित्य साधून समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी सन्माननीय एमडी चव्हाण सर यांचा सेवानिवृत्ती पर माननीय आमदार दादा भोंगळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व शिल्ड देऊन करण्यात आला, सोबतच सन्माननीय दामोदर राठोड सर यांचा सुद्धा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला, समाजातील उत्तम योगदानाबद्दलन इंजिनीयर संतोष राठोड सर, महेश चव्हाण आणि विनोद चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी हर्ष आडे आदित्य आडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त कर्मचारी डॉक्टर तुषार रामदास जाधव तसेच किरण विजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय संस्थानचे सचिव उत्तम जाधव , विनोद चव्हाण यांनी केले, सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थांन चे संचालक दिलीप राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थांन चे संचालक उल्हास पवार सर यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थांन चे उपाध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव उत्तम जाधव ,सहसचिव अशोक जाधव ,कोषाध्यक्ष कनीरामजी पवार, सुभाष जाधव, माधव पवार देविदास पवार, शिवाजी राठोड, संतोष राठोड ,कैलास पवार ,वामन जाधव ,उल्हास पवार ,शंकर राठोड यांनी आहे अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला गडचांदूर व परिसरातील गोर बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच दरवर्षीप्रमाणे यंदाही संत सेवालाल महाराज ची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.



