पांढरसराड येथे लकवा ग्रस्त अविनाश गावडे यांना व्हीलचेअर भेट
साथ फाउंडेशन सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पांढरसराड येथील युवक अविनाश गावडे हा अनेक दिवसापासून लकव्या सारख्या दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याची माहिती साथ फाउंडेशनच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष रोहित बोम्मावार यांना देण्यात आली.त्यानंतर सामजिक भावनेतून अविनाश गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेत साथ फाउंडेशनच्या माध्यमातून व्हीलचेअर भेट स्वरूपात देऊन मदत करण्यात आली.
यावेळी साथ फाउंडेशनचे संचालक तथा भाजपा जेष्ठ नेते प्रकाश पा. गड्डमवार,दिनकर सोनवणे, ईश्वर बट्टे,आशिष गेडाम, प्रकाश वरगंटीवार,आकाश बुर्रीवार, ताराचंद खोब्रागडे, निलेश पुटकमवार, प्रफुल निरुड़वार, संदिप कोरवते, प्रतीक वाकडे,अशोक कड्याम, निलेश गावडे, नरेश गावडे, सुरेश गावडे,दिवाकर मेश्राम, विवेक मुप्पावार, युवराज गेडाम, भिकाजी गावडे, मायाताई गेडाम, निर्मलाताई सीडाम, अर्चनाताई गावडे, ज्योतीताई गावडे, सौ आरतीताई गावडे आदी गावकरी उपस्थित होते.



